गीता प्रवचने (विनोबा)

लेखक: विनोबा भावे
वाचक: माधवी गणपुले
(संपर्क: voiceofmadhavi@gmail.com)
---------------------------------------

आचार्य विनोबा भावे यांनी वर्ध्याच्या तुरुंगात असताना दिलेली गीतेवरील प्रवचने तेव्हा तिथेच शिक्षा भोगत असलेल्या साने गुरुजींनी शब्दश: लिहून घेतली. महर्षी व्यासकृत महाभारताचे सार अशी गीता भारतीयांना कायमच दिशा दाखवत आलेली आहे. तिचा संदेश विनोबा सोप्या, सामान्यांना समजेलशा भाषेत पोहोचवितात. या पुस्तकाला बोलत्या स्वरूपात सादर करण्याची परवानगी दिल्याबद्दल ब्रह्मविद्या मंदिर आश्रम, पवनार यांचे मन:पूर्वक आभार.

ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)
संपूर्ण पुस्तक(Zip: 557MB)
मुखपृष्ठ
कालिंदीताई सरवटेंबद्दल
प्रस्तावना
दोन शब्द
अध्याय १
अध्याय २
अध्याय ३
अध्याय ४
अध्याय ५
अध्याय ६
अध्याय ७
अध्याय ८
अध्याय ९
अध्याय १०
अध्याय ११
अध्याय १२
अध्याय १३
अध्याय १४
अध्याय १५
अध्याय १६
अध्याय १७
अध्याय १८



-----------------------------------------------------------------------------------

5 comments:

chemburkar8 said...

aadarniya mahoday,
khupach chhan. bhagwad geeta vachli hoti. pan geeta saar aikun tyatil kharach rahasya kalali.
mee ek 100 % apang aahe. tumchya hya upaskramane malazyashi koni bolat aahe asse vatate.
akte panachi janiv hot nahi
ha upakram kharach sutya aahe.
ashich aapli pragati hovun aamhas ajun chhan chhan aikavavi hich hridayast ichha.
dhanyawad,
rajesh

Smart Indian said...

विनोबा जी के प्रवचन को स्वर देकर आपने बहुत अच्छा काम किया है। पित्स्बर्ग मे कुछ मित्रों ने मिलकर इसी पुस्तक के हिन्दी, अङ्ग्रेज़ी और गुजरती संस्करणों पर काम किया था परंतु हमें तब कोई मराठी वाचक नहीं मिला पाया था। आपका हरदी आभार और शुभकामनायें!

Unknown said...

Namaskar ! bolati pustake is something like one finds a hidden treasure ! from my childhood i wanted to read smrutichitre i got it now and a v. s. thanks to all ur team , reason is last 3 yrs i'm bedridden , the only work i can do is reading the books but unfortunately not able to hold books in hands too but now i can listen all the books u have on your site i request please keep more more options . dhanyosmi foreverything 1 s again

Ashish Bhave, Money and Life Freedom Coach. said...

Many many thanks ! Its a great help you had extended to people like me !

Wish you all the success in life.

Madhavi Patkar Ganpule said...

विनोबांची गीताई आणि गीता प्रवचने
भारतीय जीवनावर ‘गीते’चा फारच मोठा प्रभाव आहे. तरीही पण मराठी मनाला तिचे सर्वात जास्त आकर्षण आहे. मराठी भाषेत आजपर्यंत गीतेसंबंधी विपुल लिहिले गेले आहे. ‘ ज्ञानेश्वरी’ हा तर अमृताचा डोहच आहे. . पण ज्ञानोबांनंतर ‘गीते’ वर अत्यंत मधुर आणि हृदयस्पर्शी असे लिखाण जर मराठी भाषेत कुणी केले असेल तर ते आमच्या विनोबांनी. विनोबांची गीताई हा मराठी साहित्यातला एक मोठा चमत्कार आहे.
गीताई लिहिण्यामागची त्यांची भूमिका अशी : गीतेमध्ये सर्वोत्तम, आध्यात्मिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन आहे अशी त्यांची श्रद्धा... कर्मयोग, आणि प्रेमयोग , ध्यानयोग आणि ज्ञानयोग , बुद्धीयोग आणि शुद्धी योग हे गीतेने सारे एकाच जीवन सूत्रात ओवून टाकलेले आहेत असे त्यांना वाटे. गीतेच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा यत्न करीत गेल्याने अपार शांती मिळते असा त्यांना अनुभव येत गेला. म्हणून सर्वसामान्य जनतेची निष्ठा गीतेवर स्थिर व्हावी ह्या तळमळीने त्यांनी गीता मराठीत आणायचे ठरवले.
तीस एकतीस साली एका विशिष्ट मानसिक योगावस्थेत त्यांनी ‘गीताई’ ची रचना केली. १९३२ साली टी प्रथम प्रसिद्ध झाली. गीताईची रचना इतकी सोपी, रसाळ, आणि प्रासादिक आहे की, टी वाचता वाचताच होतो. पण अर्थाचे आकलन करून घ्यावयास पदोपदी थांबावे लागते. ही अडचण गीताईच्या बाबतीत भासत नाही. अर्थ चटकन ध्यानात येतो आणि चिंतनाची प्रक्रिया लगेच चालू होते.
गीताई ही जर अमृताची पुष्करणी असेल तर ‘गीताप्रवचने’ हे त्या पुष्करिणीमधील हजार धारांचे एक सोन्याचे कारंजे आहे. त्याच्या सौंदर्याचे आणि माधुर्याचे वर्णन करताना आमचे शब्द तोकडे पडतात. ‘गीताप्रवचनां’ ची तुलना जर करावयाचीच झाली तर ते फक्त ‘ज्ञानेश्वरी’ शीच होऊ शकेल. गीतेचे असे हृदयस्पर्शी रसग्रहण कोणत्याही भारतीय भाषेत आजपर्यंत कोणी केले नसेल॰
गीताप्रवचने हे नाव गीताई इतके सोपे नाही. ‘प्रवचने’ म्हटल्यानंतर त्याचे तात्विक आणि क्लिष्ट स्वरूपच डोळ्यांपुढे उभे राहते. पण, व्यवहारातले नित्याच्या परिचयाचे इतके साधे साधे दृष्टान्त विनोबा देतात की किती कठीण मुद्दा असो, त्याचे पदर उलगडून तो आपोआप तुमच्यापुढे मोकळा होतो. अभिनव विचारांनी आई माधुर्यपूर्ण भाषेने सारी ‘प्रवचने’ अगदी फुलुन गेली आहेत.

आचार्य अत्रे (नवयुग ७-२-१९५४)
(संदर्भ- संत आणि साहित्य. लेखक- आचार्य अत्रे. पार्श्व प्रकाशन, कोल्हापूर )