प्रेमपंथ अहिंसेचा - विनोबा

लेखक: विनोबा भावे
वाचक: माधवी गणपुले
(संपर्क: voiceofmadhavi@gmail.com)
---------------------------------------

प्रेमपंथ अहिंसेचा : विनोबांची जीवनकथा त्यांच्याच शब्दात. परंधाम प्रकाशन(जि.वर्धा )
सादर सहन प्रखर शोधन
धैर्य- संरक्षण निरंतर
ऐसा प्रेम-पंथ राखूं हा जागृत
सकळ पुनीत हाती येणें
वैरी करी साह्य चोर बंधु होय
वक्रताही जाय खळाची ती
पाउलापाऊली ईश्वराचे भान
सत्याचे दर्शन अधिकाधिक
भासुनी क्लेशाचा असूनी सुखाचा
पंथ अहिंसेचा विन्या म्हणे

आपले विचार आपण बदलू शकतो. अशा रीतीने विचारांची वाढ होत जाते. याचा मला निरंतर अनुभव येत असतो. म्हणुन मी काही वादी नाही. ...प्रेम आणि विचार यात जी शक्ती आहे, आणखी कशातही नाही. कुठल्याही संस्थेत नाही, सरकार मधे नाही, कोणत्याही वादात नाही, शास्त्रात नाही, शस्त्रात नाही ........माझ्या कार्याच्या मुळाशी करुणा आहे. प्रेम आहे आणि विचार आहे....... माझा मानसिक कल महाविरांच्या पद्धतीकडे अधिक आहे. पण मी जे कार्य केले तें भगवान बुद्धांच्या पद्धतीने केले...... माझा अप्रोच कबिराचा आहे.... शंकर, ज्ञानदेव आणि गांधी या तिघांकडून मला सर्वाधिक मदत मिळाली आहे.... पण माझ्या जिवनाला आणि हृद्याला कोणी गोडी आणली असेल आणि या पाषाणातुन पाणी काढण्याचा , याला पाझर फोडण्याचा पराक्रम कोणी केला असेल तर तो मात्र ज्ञानदेवांनीच केला...........मला विज्ञानाची प्रक्रिया वडिलांनी आणि उपनिषदांचे रहस्य आईने सांगीतले. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवण्यात मोठा अर्थआहे....... शब्द प्रकट होण्याकरता शब्द बाजुला करुन आतले तत्त्व ग्रहण झाले पाहिजे. शब्द पचविल्याशिवाय, मनन करुन त्याचा अनुभव घेतल्याशिवाय असें ग्रहण होऊ शकत नाही अशी माझी श्रद्धा आहे.......ध्यान, कर्म, भक्ती, सेवा या सगळ्यात मी फरक करु शकत नाही...... ईश्वराचा साक्षात्कार तीन प्रकारे होत असतो- एक सामान्य जनतेच्या रुपात, दुसरा विशाल निसर्गाच्या रुपात, तिसरा अंतर्यामीच्या रुपात. तिन्ही मिळुन परमात्म –साक्षात्कार पूर्ण होत असतो.... शरीरात श्वासाचे जें स्थान आहे तेंच समाजात विश्वासाचे आहे................

या पुस्तकाला बोलत्या स्वरूपात सादर करण्याची परवानगी दिल्याबद्दल ब्रह्मविद्या मंदिर आश्रम, पवनार यांचे मन:पूर्वक आभार.

ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)
संपूर्ण पुस्तक(Zip: 795MB)
मुखपृष्ठ
विनुस्मृती
किंचित
अनुक्रमणिका
आरंभ
आयुक्त: अनुक्रमणिका
बालपण
अथतो ब्रह्मजिज्ञासा
युक्त: अनुक्रमणिका
संत चरण राज सेविता
अंत्योदयाची साधना
वियुक्त: अनुक्रमणिका
धर्मचक्र प्रवर्तन
वाङ्मय उपासना
वाङ्मय सेवा
जीवनाची प्रयोगशाळा
साधनेविषयी थोडेसे
अनुभूती
मुक्त: अनुक्रमणिका
अभिज्ञान
समाधी - परिशिष्ट
झनन झन बाजे - सलीलदा



-----------------------------------------------------------------------------------

No comments: